प्रतिनिधी / कागल
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी जवळ झालेल्या ट्रक व दुचाकी अपघातात वडिल व मुलगी जखमी झाले.
याबाबत अधिक महिती अशी, भैरेवाडी ता. गडहिंग्लज येथील मल्लिकार्जुन गडकरी हे आपली मुलगी सरिता हिच्यासोबत दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. कोगनोळीजवळ आले असता थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओव्हर टेक करीत असताना याचवेळी मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकची धडक बसली. पुढील चाकाखाली दुचाकी पडली. यावेळी दुचाकी चाकाखाली गेली सुदैवाने वडिल व मुलगी रस्त्यावर ट्रकच्या उजव्या बाजूला कोसळले. यामध्ये हे दोघे जखमी झाले. हायवे कर्मचाऱ्यांनी तातडीने आपल्या वाहनातून या दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. किरकोळ दुखापत असल्याने प्रथमोपचार करून त्यांना सोडण्यात आले. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कर्नाटक पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.