प्रतिनिधी / कुरुंदवाड
या वर्षी पावसाचा अनियमितपणामुळे शिरोळ तालुक्यातील दत्त क्षेत्र श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत कमी जास्त होत असून श्रावण महिना सुरू होऊन आठवडा उलटला तरी देखील येथील दत्त मंदिरापर्यंत नदीची पाणीपातळी न पोहोचल्याने असंख्य दत्तभक्त व ग्रामस्थांना दक्षिणद्वार सोहळाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
सर्वसाधारणपणे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आराधन उत्सव समाप्ती दरम्यान किंवा आषाढ महिन्याच्या अखेरीस किंवा श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीस येथील दत्तमंदिरासमोरील कृष्णा व पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढते व दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न होतो. या सोहळ्यात मंदिराच्या दक्षिण बाजूचे दरवाज्यात स्नान करण्यासाठी इचलकरंजी जयसिंगपूर सांगली कोल्हापूर आदी अनेक तसेच उगार चिकोडी बेळगाव या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. मात्र या वर्षी कोरोना संसर्गाच्या महामारी च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असलेने मंदिर भाविकांना दर्शनासाठी 17 मार्च 2020 पासून बंद आहे. मात्र सध्या श्रावण महिना सुरू होऊन आठ दिवस उलटले तरीही दत्त मंदीरात कृष्णा नदीचे पाणी पोहोचले नाही.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध प्राचीन दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून समोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडूनदक्षिण दिशेकडे वाहते सातारा कराड सांगली चे कृष्णा नदीत व गगनबावडा राधानगरी कोल्हापूर आदी ठिकाणचे सर्वच पाणी पंचगंगे कडे येत असल्याने येथे पाणी पातळी पावसात झपाट्याने वाढते येथील नदीचे पाणी वाढले की ते येथील दत्त मंदिरा पर्यंत पोहचते. दक्षिणद्वार सोहळा म्हणजे वाढलेले नदीचे पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून शिरलेले कृष्णा नदीचे प्रवाहाचे पाणी येथील श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडते या वेळी दक्षिण द्वारातून बाहेर पडणाऱ्या तीर्थात स्नान करणे म्हणजे फार पुण्यकारक मानले जाते तसेच या सोहळ्यात स्नान केल्याने मानवांच्या पापाचा ह्रास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची धारणा व श्रद्धा आहे.
Previous Articleजगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पावणेदोन कोटींवर
Next Article पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी
Related Posts
Add A Comment