ऑनलाईन टीम / गझियाबाद :
देशात देवदेवतांची असंख्य मंदिरे आहेत. मात्र, देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचा सन्मान व्हावा आणि त्यांना ईश्वराच्या स्थानी ठेवण्यात यावे, यासाठी उत्तरप्रदेशातील गझियाबादमध्ये देशातील पहिले शहिदांचे मंदिर उभारण्यात येत आहे.
गझियाबादमधील बालनाथ आश्रम परिसरात या मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या मंदिराच्या निर्माणासाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करण्यात आली असून, 75 वर्षीय संन्यासी स्वामी बालनाथ हे या ट्रस्टचे संचालक आहेत. शहिदांच्या या पहिल्या मंदिरात देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची रोज पूजा करण्यात येणार आहे.