इचलकरंजी / प्रतिनिधी
कबनूर (ता. हातकणंगले ) येथे गांजा पार्टीमधील नशा बहाद्दरानी पानपट्टीमधून सिगारेट आणून दिले नसल्याच्या रागातून दोघा युवकाच्या अंगाचा चावा घेवून, त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. विकास विश्वास साळूंखे ( वय ३०), सुनिल विकास .साळूंखे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. तर पोलिसांनी तिघा नशाबहाद्दरापैकी दोघाना ताब्यात घेतले आहे. एक जण पोलिसांना चकवा देवून पसार झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली असून, यांची पोलिसात नोद झाली आहे.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, कबनूर- देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी कारखाना रोडवर काडाप्पा तळ नावाचा परिसर आहे. या परिसरात ओपन बार बरोबर गांजा पार्टी असे अवैध धंदे खुलेआमपणे सुरु असतात. सोमवारी या परिसरात तिघे जण गांजा पार्टी करीत होते. याच दरम्यान या भागात जखमी विकास साळुंखे, सुनिल साळुंखे हे दोघे लघूशंका करण्यासाठी गेले होते. यावेळी गांजा पार्टीतील तिघा नशाबहाद्दरानी त्याना पानपट्टीच्या खोक्यामधून सिगारेट विकत घेवून ये, असे सांगू लागले. त्यावेळी जखमी दोघानी नकार दिल्याने तिघा नशाबाजानी त्याना शिवीगाळ करीत, त्याच्या शरीराचा चावा घेत कोयत्याने प्राण घातक हल्ला करून गंभीर केले. जखमीना नातेवाईकांनी उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी त्वरीत आयजीएम रुग्णालयात धाव घेतली. जखमीवर झालेल्या प्राण घातक हल्याची माहिती घेतली. या घटनेची गांभीर्याने दखल घेवून गांजा पार्टीच्या परिसरातून दोघाचा शोध घेवून जेरबंद केले. तर एक जण पोलीसाना चकवा देवून पसार झाला.
Previous Articleउस्मानाबाद जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपची बाजी
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात 11 नवे रूग्ण, 5 कोरोनामुक्त
Related Posts
Add A Comment