नवी दिल्ली :
सध्या कोविडच्या संकटामुळे गुंतवणुकदार सावध भूमिका घेत आहेत. दरम्यान म्युच्युअल फंडांमध्ये एप्रिल 2020 मध्ये जवळपास सात लाख गुंतवणूकदारांनी खाती उघडली असल्याचे समोर आले आहे.
यावरून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे स्पष्ट होते. शेअर बाजारामधील घसरणीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदार आपल्याकडे असणारा पैसा म्युच्युअल फंडात गुंतवत आहेत. अस्थिर वातावरणामध्ये म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे सकारात्मकतेने पाहिले जात आहे.