ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘तौक्ते’ आणि ‘यास’ चक्रीवादळांचा मान्सूनवर कोणताही परिणाम झालेला नाही. नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच 31 मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. मात्र, या दोन्ही चक्रीवादळांमुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीच देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
नैऋत्य मोसमी वारे मालदीव-कोमोरिनेच्या काही भागातून पुढे गेले आहे. ते आता बंगालच्या नैऋत्य आणि ईशान्यकडील उपसागरात दाखल झाले आहे. गुरुवारी सकाळीच हे वारे आखाती आग्नेय आणि पश्चिम मध्यच्या काही भागात पोहोचले होते. 31 मे ला ते केरळात दाखल होईल.