प्रतिनिधी/ बेळगाव
एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून गणेशपूर गल्ली, शहापूर येथील एका तरुणावर बुधवारी रात्री रॉड व चाकूने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. खुनी हल्ल्याच्या घटनेनंतर केवळ 24 तासांत दोघा जणांच्या मुसक्मया आवळण्यात आल्या आहेत.
शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी 24 तासांत दोघा जणांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. करण परशराम काळे, निशांत प्रकाश काळे (दोघेही रा. गणेशपूर गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत.
बुधवारी रात्री नचिकेत उर्फ शेखर ज्ञानेश्वर शहापूरकर (वय 25) या तरुणावर चाकू व रॉडने हल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. गेल्या वषी क्षुल्लक कारणावरून नचिकेत व करण या दोघांमध्ये भांडण झाले होते. या भांडणाच्या हल्ल्यातून खुनी हल्ल्याचा हा प्रकार घडला आहे.