प्रतिनिधी / कुर्डुवाडी
चिंकहिल ता.माढा येथील एका पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या कुटुंबाला बार्शी येथे हलविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
बार्शी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्याचा २२ जुन रोजी स्वॅब घेण्यात आला होता व त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दि २२ ते २४ तो चिंकहिल येथील घरी राहत होता. दि २४ च्या रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबाला बार्शी येथे हलवण्यात आले. तीन दिवस राहिल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तो अर्धा किमी त्रिज्येचा परिसर कटेंन्मेंट झोन तर एक किमी त्रिज्येचा परिसर बफर झोन म्हणून जाहिर करण्यात आला. सकाळी तहसिलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पलंगे, पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे, मंडलाधिकारी, तलाठी, यांनी भेट देऊन परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले. परंतू हा पोलिस कर्मचारी बुधवारी कुर्डुवाडी शहरातून काही दुकानात फिरुन गेल्याचे समजते.