मुख्य बसस्थानकावरील दलदलीचा प्रवाशांना फटका : हायटेक बसस्थानक केव्हा पूर्णत्वाला येणार?

प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ाचे मुख्यालय असलेल्या बेळगाव बसस्थानकाचा प्रवास चिखलाच्या डबक्मयातून होत आहे. नवीन बसस्थानकाचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे जागो जागी चिखलाची तळी साचली असून, त्यातून वाट काढत प्रवासी प्रवास करत आहेत. जिल्हय़ाच्या मुख्य बसस्थानकावरच जर ही परिस्थिती असेल तर इतर बसस्थानकांचा विचारही न केलेला बरा, अशी प्रतिक्रिया सामान्य प्रवासी करीत आहेत.
बसस्थानकाच्या कामाला सुरुवात करून अनेक वर्षे उलटली तरी अद्याप बसस्थानक पूर्णत्वाला आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदाराला निधीच उपलब्ध होत नसल्याने काम रखडले जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या सर्वांचा फटका मात्र प्रवाशांना बसत आहे. बस पकडण्यासाठी चिखल व दलदलीतून प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. यामुळे बऱयाच वेळा चिखलामध्ये पडल्याने अपघातही घडत आहेत. तसेच येणाजाणाऱया प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे. त्यामुळे स्वप्न दाखविलेले हायटेक बसस्थानक केव्हा पूर्णत्वाला येणार? असा प्रश्न उपस्थित होत
आहे.
सोशल मीडियावर मिम्स व्हायरल
बेळगाव बसस्थानक हे हायटेक होणार त्यामध्ये वर्ल्डक्लास सेवा मिळणार अशी आश्वासने उद्घाटनावेळी देण्यात आली होती. परंतु अनेक वर्षे उलटली तरी अद्याप नागरिकांना डबक्मयांमधूनच वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे परदेशातील बसस्थानक व बेळगावच्या डबक्मयामधील साचलेले पाणी असा एकत्र फोटो करत त्यावरील मिम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. निदान आतातरी सरकारला जाग येणार का, असा प्रश्न मार्मिकपणे विचारला जात आहे.
बेळगावकरांच्या पदरी निराशाच
बेळगावमधून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये बेळगावमधून बस वाहतूक होते. त्यामुळे एक उत्तम दर्जाचे बसस्थानक असणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात लाल चिखल व डबकी बसस्थानकावर आहेत. बेळगाव जिल्हय़ाला परिवहन मंत्रिपद मिळाल्यानंतर बसस्थानकाचा प्रश्न सुटेल, असा विश्वास नागरिकांना होता. परंतु बेळगावला परिवहन मंत्रिपद मिळूनदेखील बसस्थानकाचे काम अर्धवट स्थितीतच आहे. त्यामुळे बेळगावकरांच्या पदरी शेवटी निराशाच पडत आहे.