ऑनलाईन टीम / जम्मू :
माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी नवे उपराज्यपाल म्हणून शपथ घेतली. जम्मू काश्मीरच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी राजभवनात त्यांना शपथ दिली.

यावेळी सिन्हा यांनी सांगितले की, काश्मीर भारताचा स्वर्ग आहे. मला ही भूमिका निभावण्याची संधी मिळाली आहे. मागील वर्षी जम्मू काश्मीरमध्ये जी विकासकामे सुरू करण्यात आली आहेत, ती लवकरात लवकर पूर्ण करणे हे माझे पहिले प्राधान्य असेल.
पुढे ते म्हणाले, कोणताही पक्षपात न करता घटनात्मक शक्तींचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी केला जाईल. मी लोकांना विश्वासाने सांगतो की, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. तसेच त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल. माझा मुख्य उद्देश येथील विकास करणे हाच आहे. असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.