ऑनलाईन टीम / मुंबई :
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवानांना वीरमरण आले आहे. त्यांच्या या वीर मरणावर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट लिहीत शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे.

अमिताभ बच्चन आपल्या ट्विट मध्ये लिहितात की, ‘…. ज़रा आँख में भर लो पानी ; जो शहीद हुए हैं उनकी , ज़रा याद करो क़ुर्बानी ….’ या जवानांनी आपल्या देशाचे संरक्षण करत असताना आपल्या जीवाची बाजी लावत आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिले आहे. भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांना माझे सॅल्युट, जय हिंद!
दरम्यान, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय लष्कर आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले. तर भारताच्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिकही मारले गेले आहे. या घटनेनंतर भारत व चीन यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.