ऑनलाइन टीम तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. अनेक लोकांनी वीर दासवर देशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. वीर दास सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्याने माफी मागितली असली तरी देखील त्याच्यावर टीका होत आहे. यावर आता शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना संतापले आहेत.त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुकेश खन्ना यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. जो कॉमेडियन स्वत:ला वीर दास बोलतो आणि स्वत:ला यशस्वी कॉमेडियन समजतो, त्याने स्टॅंडअप कॉमेडीच नाव खराब केलं आहे, असे मुकेश खन्ना म्हणाले. या वीर दासला काय सिद्ध करायचं आहे. त्याची इतकी हिंमत की संपूर्ण देशाविरोधात तो बोलत आहे. त्यात तो दुसऱ्या देशाच्या एका हॉलमध्ये आपल्या देशाचे नाव खराब आणि देशाबद्दल वाईट गोष्टी बोलतो?असं ते या व्हिडीओ मध्ये म्हणाले आहेत.
“Washington DC च्या हॉलमध्ये जितक्या टाळ्या वाजल्या, चाबकाने तितकेच फटके आपल्या देशवासीयांच्या वतीने त्याला दिले पाहिजे. परदेशात आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांची हिंमत तोडली पाहिजे, जेणे करूण भविष्यात असं करायची हिंमत कोणी करणार नाही.”असं व्हिडीओ शेअर करतं या कॅप्शन मध्ये लिहले आहे.