लातों के भूत, बातों से नहीं मानते
सैफ अली खान आणि अर्जुन कपूरनंतर ‘भूत पुलिस’मध्ये जॅकलीन फर्नांडिसचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टरमधील जॅकलीनचा लुक अत्यंत आकर्षक आहे. पोस्टरमध्ये जॅकलीन हातात हंटर घेऊन असल्याने तिची तुलना ‘हंटर रानी’शी केली जात आहे. पोस्टरसोबत ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ अशी कॅप्शनही देण्यात आली आहे. चित्रपटात सैफ, यामी गौतम, जॅकलीन आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपटातील जॅकलीनच्या व्यक्तिरेखेचे नाव ‘कनिका’ आहे. हा चित्रपट लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सैफ हा विभूति तर अर्जुन चिरौंजी ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
काही दिवसांपूर्वी सैफ अली खानचा फर्स्ट लुकही प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर एक नवा वाद सुरू झाला होता. या पोस्टरमुळे धर्माचा अपमान झाल्याचा आरोप होत आहे. चित्रपट निर्माते पुन्हा एकदा हिंदू धर्माची थट्टा करत असल्याची टीका सोशल मीडियावरून केली जात आहे.