प्रवीण जाधव/ रत्नागिरी
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ हाती घेण्यात आले आह़े यामध्ये जिह्यात 90 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीची योजना आखण्यात आली आह़े खासगी व सरकारी दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांचा यामध्ये समावेश करण्यात आला आह़े तिसरी लाट अधिक जोरदार येण्याची शक्यता असल्याने जिल्हा यंत्रणा सतर्क झाली आह़े
कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा संपूर्ण देशभर जाणवू लागला होत़ा रत्नागिरीचा विचार करता या ठिकाणी 27 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज जाणवू लागली होत़ी तर कोरोनाची तिसरी लाट अधिक भयानक स्वरूप धारण शक्यता वर्तवण्यात आली आह़े त्यानुसार रत्नागिरी जिह्याला सुमारे तीनपट ऑक्सिजनची जाणवू शकते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून 90 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेची तयारी सुरू केली आह़े
महिला रूग्णालय रत्नागिरी येथे 20, जिल्हा शासकीय रूग्णालय येथे 20, दापोली येथे 11, चिपळूण येथे 10, केळवलीत 6.85, संगमेश्वरमध्ये 6.85 तर रायपाटण येथे 6.85 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आह़े यामध्ये जिल्हा शासकीय रूग्णालय येथे 14 मेट्रीक टन ऑक्सिजन हवेतून तर 7.09 ऑक्सिजन लिक्विड फॉर्ममध्ये उपलब्ध होणार आह़े तसेच एका खासगी रूग्णालयामध्येही ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आह़े
रत्नागिरी, पाली, सिद्धीविनायक हॉस्पिटल येथे ऑक्सिजनची उपलब्धता होणार आह़े तसेच पंतप्रधान केअर फंडातून शासकीय रूग्णालय गुहागर व दापोली येथे ऑक्सिजन प्लांटची योजना कार्यान्वित करण्यात येणार आह़े कोरोनाच्या दुसऱया लाटेचा मोठा फटका रत्नागिरी जिह्याला बसला होत़ा जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 75 हजाराच्या पुढे गेली आह़े तर सुमारे 2 हजाराहून अधिक जणांना कोरोनाच्या दुसऱया लाटेत प्राण गमवावे लागल़े
कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये सर्वाधिक गरज ही ऑक्सिजनची जाणवू लागली होत़ी अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता नसल्याने जिह्याबाहेर रूग्ण हलवावे लागल़े हाच धोका लक्षात घेवून राज्य शासनाकडून तिसऱया लाटेसाठी तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ दुसऱया लाटेमध्ये रत्नागिरी जिह्याची गरज 27 मेट्रीक टनपर्यंत गेली होत़ी आता मात्र हीच गरज तिप्पट वाढण्याची शक्यता आह़े 90 मेट्रीक टनपर्यंत ऑक्सिजन निर्मिती करावी, अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत़
जिल्हा प्रशासनाकडून तयारी
कोरोनामध्ये रत्नागिरी जिल्हा हा हॉटस्पॉट झाला होत़ा तसेच डेल्टा व्हेरीएंटचे सर्वाधिक रूग्ण हे रत्नागिरी जिह्यातच आढळले होत़े राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने बाहेरील राज्यातून ऑक्सिजन मागवला जात होत़ा यामध्ये रत्नागिरी जिह्यालाही वेळेत ऑक्सिजन मिळण्यात अडचणी येत होत्य़ा यासाठी ऑक्सिजन स्वावलंबनासाठी पुढाकार घ्या, असा आदेश राज्यस्तरावरून देण्यात आल़ा त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आह़े
युध्दपातळीवर काम सुरू
जिल्हय़ात तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी 90 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे टारगेट ठेवण्यात आले आहे. त्यामधील 70 टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. तर उर्वरित काम पुढील 15 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.