ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात केवळ 85 नवे रुग्ण आढळून आले असून 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवशी 150 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 33 हजार 675 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 07 हजार 116 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.12 % इतका आहे. तर आतापर्यंत 24,961 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सद्य स्थितीत 1 हजार 598 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 12 लाख 03 हजार 679 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 50,839 आरटीपीसीआर टेस्ट आणि 22,081 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 1,817 झोन आहेत.
- लसीकरणाचा डाटा
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 1,66,310 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 1,47,873 जणांना पहिला डोस तर 18,437 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 71 लाख 29 हजार 002 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 54,63,512 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 16,66,490 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.