ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशातील अनेक राज्यात औषधे, ऑक्सीजनची कमी असल्याने अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यातच आता दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन अभावी शनिवारी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात बत्रा हास्पिटलकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे की, रूग्णालयाने कोर्टात सांगितले की, रुग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून, तासभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. आमच्याकडे दुपारी 12 वाजता ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर आम्हाला दीड वाजता ऑक्सिजन मिळाला. परिणामी आमच्या रुग्णालयातील 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे.

यावर उच्च न्यायालायने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत आज 490 मेट्रीक टन ऑक्सिजन पोहचली पाहिजे. जर याचे पालन केले गेले नाही तर न्यायलय अवमाननाची कारवाई करू शकते. जर हे काम पूर्ण झाले नाही तर डीपीआयटीच्या सचिवास पुढील सुनावणीत न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल.