ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील दैनंदिन रुग्ण संख्येत चढ – उतार होताना दिसून येत आहे. मागील 24 तासात 41,383 नवे रुग्ण आढळून आले. तर 507 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 12 लाख 57 हजार 720 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4 लाख 18 हजार 987 जणांनी आपला जीव गमावला आहे.

बुधवारी देशात 38 हजार 652 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 कोटी 04 लाख 29 हजार 339 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 4 लाख 09 हजार 394 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 22 लाख 77 हजार लसींचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत देशातील 41 कोटी 78 लाख 51 हजार 151 जणांना लस देण्यात आली आहे.
- सक्रिय रुग्ण संख्येत भारत जगात सातव्या स्थानी
दरम्यान, देशातील रिकव्हरी दर आता 97 टक्क्यांपेक्षा अधिक आहे तर ॲक्टिव्ह रुग्णांचा दर 1.30 टक्के आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात सातव्या स्थानी पोहोचला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

आतापर्यंत देशात 45 कोटी 09 लाख 11 हजार 712 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 17 लाख 18 हजार 439 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 21 जुलै 2021) एका दिवसात करण्यात आल्या.