जुन्या भाजी मार्केट येथे 17 हजारांसह 6 दुचाकी,15 मोबाईल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
शहर परिसरात दोन ठिकाणी पोलिसांनी मटका अड्डय़ांवर टाकलेल्या छाप्यात 26 जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 51 हजार रुपयांसह 11 दुचाकी आणि 30 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
येथील जुन्या भाजी मार्केटजवळ मंगळवारी रात्री उशिरा मटका अड्डय़ावर छापा टाकून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 17 हजार 20 रुपये रोख रक्कम, 6 दुचाकी व 15 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या सर्व 13 जणांविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
प्रमोद मधुकर पाटील-गरडे (वय 38, रा. कामत गल्ली), सुधीर शामकुमार शेट्टी (वय 45, रा. जुने गांधीनगर), अशोक मारुती थोरात (वय 48, मूळचा रा. पाच्छापूर, सध्या रा. जुने गांधीनगर), प्रवीण सहदेव बेनकट्टी (वय 32, रा. कणबर्गी), आफताब रफीक अनगोळकर (वय 20, रा. कलईगार गल्ली), हरिष दयानंद केशव (वय 43, रा. अनगोळ), अन्वर हुसेनसाब मुल्ला (वय 27, रा. कसई खड्डा), कृष्णा बसवंत बडीगेर (वय 27, रा. फुलबाग गल्ली क्रॉस), नजीरअहम्मद नुरअहम्मद सरकावस (वय 40, रा. वीरभद्रनगर), गोपालपटेल नागुपटेल (वय 40, रा. शिरोळ-एमआयडीसी, कोल्हापूर), अतिकरेहमान अब्दुलखादर देवलापूर (वय 53, रा. न्यू गांधीनगर), सैयद इस्माईल सैयदअल्लाउद्दीन मिरचोने (वय 40, रा. केपे-शिरवई-गोवा), नौशाद आप्पासाब देसाई (वय 49, रा. खंजर गल्ली) अशी त्यांची नावे आहेत.
खंजर गल्लीत 34 हजार रोख, 15 मोबाईलसह 5 दुचाकी जप्त

खंजर गल्ली येथील लाकूड अड्डा परिसरातील मटका अड्डय़ावर बुधवारी रात्री छापा टाकण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी तेरा जणांना अटक करून त्यांच्या जवळून 34 हजार 20 रुपये रोकड, 15 मोबाईल संच व 5 दुचाकी जप्त केल्या आहेत.
मंगळवारी रात्री उशिरा जुन्या भाजी मार्केट परिसरातील मटका अड्डय़ावर छापा टाकून तेरा जणांना अटक करण्यात आली आहे. या पाठोपाठ बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी या कारवाईत भाग घेतला. सर्व तेरा जणांवर मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बाळेश शंकर रायण्णावर (वय 26) रा. अगसगा, राजू ज्ञानेश्वर गोणी (वय 48) रा. बसवन कुडची, प्रकाश बाळू गवळी (वय 45) रा. मार्केट यार्ड, पुंडलिक जनार्दन पाटील (वय 39) रा. जाफरवाडी, बाबू हरिसिंग रजपूत (वय 60) रा. तालिकोटी, जि. विजापूर, बसवराज इरय्या हिरेमठ (वय 48) रा. रामतीर्थनगर, एस. के. नजीर अन्सारी (वय 40) रा. गणपत गल्ली, मल्लिकार्जुन राजाराम बिदरभावी (वय 32) रा. अशोकनगर, हणमंत परशराम पाटील (वय 69) रा. वैभवनगर, वासीम लियाकत हाशमी (वय 31) रा. झटपट कॉलनी न्यू वैभवनगर, प्रसाद मारुती बिरडे (वय 40) रा. कंग्राळी बी. के., लंकेश यल्लाप्पा कोलकार (वय 28) रा. बेळगुंदी, रूपेश मारुती कांबळे (वय 52) रा. ताशिलदार गल्ली अशी त्यांची नावे आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुतेक जण मोलमजुरी करून गुजराण करणारे आहेत. सेंट्रिंग कामगार, वाहन चालक, गवंडी कामगार, हमाल आदींचा यात समावेश आहे.
खंजर गल्ली लाकूड अड्डा परिसरात मोठय़ा प्रमाणात मटका सुरू असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून तेरा जणांना अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.