प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेले डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी हे मंगळवारी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त त्यांचा जिल्हा प्रशासनाकडून तसेच विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. गांधीभवन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी बेळगाव जिल्हय़ामध्ये प्रशासकीय कामाचा शेवट केला. महापूर तसेच कोरोनाबाबत त्यांनी केलेले काम उल्लेखनिय असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यांना अनेकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, प्रांताधिकारी अशोक तेली, महापालिका आयुक्त जगदीश, शशिधर कुरेर, तहसीलदार कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.