प्रतिनिधी/ लांजा
कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा लांजा तालुक्यालाही चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातील 21 घरे व 1 गोठय़ाचे असे एकूण 2 लाख 30 हजार 665 रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने केले असून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. लांजा तालुक्यातील पश्चिम भागाला मोठय़ा प्रमाणावर वादळाचा फटका बसला. यामध्ये साटवली-तालयवाडी, सापुचेतळे, रुण, हर्चे, खानवली, पुनस, वेरळ, मठ, असोडे, निवसर, देवधे, वेरळ, लांजा, कुवे, गोळवशी यासह कोचरी, हर्दखळे, शिपोशी या गावांना बसला. तालुक्यातील एकूण 21 घरांसह 1 गुरांच्या गोठय़ाचे नुकसान झाले. यामध्ये लांजा तालुक्याचे 2 लाख 30 हजार 665 रुपयांचे नुकसान झाले. वादळाने घरांचे पत्रे उडाले तर काही घरांवर व गोठय़ांवर झाडे पडून शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. तर काही गावांमध्ये किरकोळ नुकसानीच्याही घटना घडल्या. चक्रीवादळामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. तालुक्यात कुठेही हानी झालेली नाही.