ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बिहारमध्ये 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. तरी देखील आज म्हणजेच बुधवारी पटणामधील मीठापूर भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसली. लोकांकडून सकाळपासूनच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जात आहे.

दरम्यान, बिहारमध्ये 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन आहे. या काळात सर्व बाजार, मॉल आणि कार्यालये देखील बंद राहतील. मात्र, या काळात आरोग्य आणि चिकित्सा सेवा, आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
असे कडक निर्बंध असून देखील पाटणा मधील पिठापूर भाजी मार्केटमध्ये आज लोकांकडून मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झालेले दिसत आहे.