प्रतिनिधी / बेळगाव
दररोज हजारो प्रवाशांनी गजबजलेल्या मध्यवर्ती बसस्थानकात अनेक समस्या निर्माण झाल्या असून याकडे परिवहनचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांतून नाराजी क्यक्त होत आहे. कोरोनामुळे प्रवाशांविना अडचणीत आलेल्या परिवहनला हळूहळू गती येत आहे. मात्र बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.
स्मार्ट बसस्थानकाच्या कामामुळे आवारात तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी आलेल्या प्रवाशांना बसण्याची आसन क्यवस्था नसल्याने बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत आहे. बसस्थानकात ठेवण्यात आलेली आसने अपुरी पडत असल्याने प्रवाशांना बसथांबा सोडून बाहेर थांबावे लागत आहे. आवारातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने अंतर्गत भाग धुळीने माखला आहे. त्यामुळे धुळीचा सामना करावा लागत आहे. त्याबरोबर स्थानिक बसेससह लांबपल्ल्याच्या बसेस एकाच ठिकाणी उभी करण्यात येत असल्याने प्रवाशांना बस शोधताना अडचणी निर्माण होत आहेत. दिवाळी सणासाठी प्रवाशांची संख्या वाढली असून प्रवाशांना बसण्यासाठी आसने नसल्याने ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना तातडीने आसनाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.