बेळगाव : मंगाई मंदिर परिसरात फिरणाऱया यल्लुबाई दंडगल या 34 वषीय मतिमंद महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांनी आसरा मिळवून दिला. यल्लुबाई गेल्या 20-25 दिवसांपासून वडगाव परिसरात भ्रमिष्ठावस्थेत फिरत होत्या. मंगाईदेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते युवराज पाटील व योगेश पाटील यांनी तिची विचारपूस केली. परंतु त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनाही माहिती दिली. त्यांनी या महिलेशी संपर्क साधला व तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. यल्लुबाई आपल्या कुटुंबाला नाहक त्रास देत असून त्यांची लहान बहीण अविवाहित आहे. यल्लुबाईची सुरक्षित व्यवस्था करा, अशी विनंती कुटुंबीयांनी केल्यानंतर माधुरी जाधव यांनी जुने बेळगाव येथील महानगरपालिका संचालित निराधार केंद्रात तिची राहण्याची सोय केली. याप्रसंगी योगेश, युवराज यांच्यासह राहुल तळेकर, राजेश पाटील, अश्विन चव्हाण, जुनेद आसिफ व संकेत धामणेकर उपस्थित होते.
Previous Articleस्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे बाबू जगजीवनराम स्मृतिदिन
Next Article लोकसेवा फौंडेशनतर्फे असोगा येथे बेल रोपांची लागवड
Related Posts
Add A Comment