मुंबई / ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरू झाली आहे. लसीकरण आणि लॉकडॉऊनवर चर्चा बैठकीत केली जाणार आहे. डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं. पण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत, हे स्पष्ट झालंय. याबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Previous Article‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी
Next Article शिवाजी विद्यापीठ अंतर्गत गुरूवारपासून ऑनलाईन परीक्षा
Related Posts
Add A Comment