प्रतिनिधी/ चिपळूण
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 10 डिसेंबर रोजी चिपळूण दौऱयावर येत आहेत. या दौऱयात ते अलोरे येथील कोयना धरण चौथ्या टप्प्याची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ठाकरे प्रथमच चिपळुणात येत आहेत. ते पुणे येथून हेलिकॉप्टरने कराड व त्यानंतर अलोरे चौथ्या टप्प्याला भेट देऊन पाहणी करणार आहेत. चौथ्या टप्प्याची सद्यस्थिती, प्रगती आणि प्रकल्पाचा एकंदर आढावा ते घेणार आहेत. य्ािं दौऱयाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी त्यानिमित्त सुरक्षेसह आवश्यक पूर्वतयारी सुरू झाली आहे.