प्रतिनिधी /पणजी
मेरशी येथील अपना घर येथे ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपसंचालक, अपना घरच्या प्रमुख प्रियंका वायंगणकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपना घरमधील मुलांनी राष्ट्रीयगीत, स्वातंत्र्य चळवळीबद्दल भाषणे सादर केली. तसेच वंदे मातरम्, जय हिंद सारख्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी उपसंचालक प्रियंका वायंगणकर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमानंतर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना वायंगणकर यांच्याहस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली.