प्र त्येक स्त्रीच्या आयुष्यात रजोनिवृत्ती येत असते. काही वेळा ही नैसर्गिक असते तर काही वेळा गर्भाशयातील काही आजारांमुळे गर्भाशय काढावे लागते. यामुळे रजोनृवृत्ती येते. याचे स्त्रियांवर अनेक परिणाम होतात.

- रजोनिवृत्तीमुळे होणारे अनेक दूरगामी परिणाम मुख्यतः हाडे, हृदय, मेंदू व मज्जासंस्था यावर दिसून येतात. पण हाडांवर होणारा परिणाम म्हणजे हाडांची ठिसूळता.
- शरीरातील हाडांच्या आत कोलॅजेन या पदार्थांमुळे अस्थिमज्जेमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅगेनीज, बोरॉन, सिलिकॉन आदी खनिजे भरलेली असतात. यामुळे हाडे मजबूत राहतात. त्यांना ताकद मिळते. पण मात्र जेव्हा या कोलॅजेनमध्ये पोकळी निर्माण होते, तेव्हा पर्यायाने हाड पोकळ बनते व त्यांची घनता कमी होऊन ते नाजूक बनते. यालाच हाडांची ठिसूळता म्हणतात.
- विशेष म्हणजे हा विकार कोणतीही पूर्वसूचना न देता शरीरात पसरतो. कधी कधी अगदी क्षुल्लक कारणाने किंवा विनाकारणसुद्धा हाड मोडून फ्रक्चर होते. पण जर योग्य काळजी घेतली तर मात्र हा आजार टाळता येऊ शकतो.
- आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमच प्रमाण खूप असते,किंबहुना ते तसे असावेत लागते. इस्ट्राजेन नावाच्या हार्मोन्सचे प्रमाण कमी झाल्यास, रजोनिवृत्तीनंतर हाडे पोकळ होऊ लागतात.
- हाडांची घनता पस्तिशीमध्ये सर्वात जास्त असते. त्यानंतर स्त्रिया व पुरुष दोघांतही ही घनता कमी होऊ लागते.
- स्त्रियांमध्ये हे प्रमाण रजोनिवृत्तीनंतर झपाटय़ाने वाढते. बहुतेक वेळेला हातपाय, कंबर दुखणे अशा तक्रारी सुरुवातीला उदभवू लागतात.
- जर विकार वाढलाच तर पाठीला पोक येणे, उंची कमी होणे, या गोष्टी जाणवतात. निदान
लवकर होण्यासाठी हाडांची घनता मोजतात, यासाठी सीटी किंवा डेक्सा बोन
डेन्सिटोमेट्रीचा उपयोग करतात.