शहर वार्ताहर / राजापूर
राजापूर पंचायत समितीच्या विविध विभागाचा कारभार सध्या वेगवेगळ्या इमरातीमधून चालत असल्याने ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत. राजापूर पंचायत समितीच्या पस्तावानुसार जिल्हाधिकाऱयांनी पंचायत समितीसाठी एकच इमारत उभारणीसाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी पंचायत समितीच्या आवारातील जमिनीची मोजणी करून घेतली आहे. त्यामुळे लवकरच पंचायत समितीचे सर्व विभाग एका इमारतीमध्ये येण्याची शक्यता बळावली आहे.
तालुका पंचायत समितीची विविध विभागाची कार्यालये एकाच इमारतीत नसल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. पंचायत समिती सदस्यांनी अनेक वेळा मासिक सभेमध्ये याबाबत ठराव पारीत केले होते. सध्या पंचायत समितीचा कारभार ज्या इमारतीमधून चालतो ती जागा जिल्हा परिषदेच्या नावावर नसल्याने इमारत उभारणीला अडचणी येत होत्या. या जागेच्या 7/12 वर सार्वजनिक बांधकाम चाळ सरकार असे नाव असल्याने पस्ताव करण्यास मोठी अडचण होती. यासाठी ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याचे पयत्न चालू झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम चाळ सरकारची ही जागा 110 गुंठे म्हणजे 2 एकर 30 गुठे आहे. या जागेमध्ये आरोग्य विभाग, किसान भवन सभागृह, मुख्य इमारत, ग्रामिण पाणी पुरवठा, सभापती दालन, एकात्मिक बालविकास पकल्प, पशुवैद्यकीय कार्यालय, धान्य गोदाम, गाडी पार्कींग, पंचायत समिती गोदाम, निवासस्थाने अशा 15 इमारती आहेत. त्यामधील धान्य गोदामाच्या दोन्ही इमारती तहसिलदार यांच्या नावे आहेत. धान्य गोदामे वगळता सर्व कार्यालये व शहरामध्ये अन्य ठिकाणी असलेली कार्यालये एकाच इमारतीमध्ये आणण्यासाठीच्या कार्यवाहीने आता जोर धरला आहे.
या संदर्भात आमदार राजन साळवी यांनी नुकतीच आराखड्यासंदर्भात चर्चा केली आहे. तालुक्याच्या दौऱयावर असताना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. एक वर्षापुर्वी पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी पाठवलल्या संयुक्त पस्तावाची दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी मोजणीचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी या जागेची मोजणी करण्यात आली आहे.
या मोजणीमधून तहसिलदारांच्या नावे असलेल्या धान्य गोदामाची जागा वेगळी करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचायत समितीची जागा किती आहे हे स्पष्ट होईल. हे आदेश सहा महिन्यापुर्वीच दिले होते. मात्र कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आले होते. पंचायत समितीच्या नविन इमारतीमध्ये सर्व कार्यालये एकत्र येणार असल्याने ग्रामस्थांची ससेहोलपट थांबणार आहे.
Previous Articleरत्नागिरी जिह्यातील 4 हजार शेतकऱयांना मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप
Related Posts
Add A Comment