पारा 18.8 पर्यंत खाली उतरला
प्रतिनिधी /पणजी
पारा 18.8 पर्यंत खाली उतरला आणि राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी सुरू झाली. आज पारा आणखी 1 डि. से. ने खाली उतरणार असल्याने पुढील 4 दिवस हे कडाक्याच्या थंडीचे रहाणार आहेत. मकर संक्रांतीकडे थंडीचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे थंडीवर उपाय तथा उर्जा मिळावी म्हणून तिळ आणि गुळ यांचे मिश्रण करून ते सेवन केले जाते. यावर्षी गोव्यात कडाक्याची थंडी सुरू झालेली आहे. ऐन मकर संक्रांतीदिनी पारा आणखी 1 डि. से. कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यात सध्या सर्वत्रच थंडीची लाट पसरलेली आहे. कोविड बाधितांचे प्रमाणही वाढले आहे.