बुधवार दि 6 ते मंगळ. दि. 12 ऑक्टो. 2021
11 ऑक्टोबरला शनी व 19 रोजी गुरु मार्गी होणार
गेल्या 23 मे पासून शनी वक्री झाल्याने अनेक राशीच्या व्यक्तीवर त्याचे दूरगामी परिणाम झाले. येत्या 11 ऑक्टोबर 2021 रोजी शनि मार्गी होणार आहे त्यामुळे शनीचा त्रास काही प्रमाणात कमी होईल तर काही राशीना या शनीचा त्रास जाणवेल. धनु राशीच्या व्यक्तींना खूप फायदा होईल. शनीची साडेसाती संपून चांगला काळ सुरू होईल मकर व कुंभ राशीच्या लोकांना या शनीमुळे चांगले दिवस येतील. मिथुन व तूळ राशीच्या बऱयाच अडचणी कमी होतील. मेष, कर्क कन्या मकर व कुंभ या राशीच्या व्यक्तींना शुभकाळ सुरू होईल. ज्यावेळी शनीची चाल किंवा रास बदलते त्या त्यावेळी जीवनात महत्त्वाची स्थित्यंतरे घडत असतात …काहीजणांना सुवर्णकाळ सुरू होतो तर काही जणांच्या जीवनात उलथापालथी होतात. मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी जरा सावधानता बाळगणे आवश्यक आहे येत्या 19 ऑक्टोबरला वक्री अवस्थेतील गुरु मार्गी होत आहेत. आतापर्यंत अनेकांना बऱयाच संकटाना तोंड द्यावे लागले असेल पण गुरु मार्गी झाल्यानंतर अनेक जटिल समस्या सुटण्यास सुरुवात होईल.
नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळू शकते. कुटुंबातील वाद विवाद कमी होतील. आर्थिक अडचणींवर मार्ग निघेल. ग्रह कितीही वाईट अथवा चांगले. असले तरी कुठेतरी त्याला निमित्त मिळाल्याशिवाय ते जागृत होत नाहीत. पडता काळ सुरू होणार असेल तर आपल्या हातून गंभीर चुका होऊ लागतात व त्याचे परिणाम नियती भोगावयास लावते व जर काही चांगला काळ सुरू होणार असेल तर आपल्या हातून काही चांगल्या घटना घडविण्यास नियती भाग पाडते. चांगल्या अथवा वाईट घटना घडण्यापूर्वी त्याची पूर्वसूचना अनेक मार्गाने नियती देत असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. त्यामुळेच महत्त्वाच्या संधी हातून निघून जातात किंवा सर्व काही सुरळीत चाललेले असताना अचानक दुर्घटना घडून सर्व काही नष्ट होऊन जाते. वीज पडणे, स्फोट, अचानक मोठय़ा दुर्घटना, अग्नि प्रलय, भूकंप, जलप्रलय ही याची काही उदाहरणे म्हणता येतील. तर वातावरण उत्साही होणे स्वस्ताई लोकांचे आरोग्य सुधारणे, कमी श्रमात मोठे लाभ, कुटुंबातील वातावरण आपोआप आनंदी होणे, नोकरी-व्यवसायात पदोन्नती अशा काही चांगल्या पूर्वसूचनादेखील मिळत असतात. पण त्या ओळखता आल्या पाहिजेत. नियतीची पावले ओळखून जो पुढील आडाखे आखतो तो माणूस कधीही संकटात पडत नाही, सावध तो सदा सुखी असे म्हणतात हे कायम लक्षात ठेवावे.
मेष
या आठवडय़ात नोकरी व्यवसाय आणि राहत्या जागेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्मयता आहे. वादावादीचे प्रसंग टाळावेत नोकरीत कितीही त्रास झाला तरी ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा पुढे फायदा होईल किंवा कायमस्वरूपी होईल. आर्थिक बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत अनेक इच्छा पूर्ण करू शकाल व्यावहारिक बाबतीत काही गोष्टी मनासारख्या होतील शारीरिक आजार कमी होतील. आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल.
वृषभ
वाहन आणि वास्तू खरेदी व मंगल कार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. हाती घेतलेली अनेक कामे पूर्ण करू शकाल. नको त्या लोकांच्या मागे लागू नका अथवा त्यांच्या सांगण्यावरून कुठेही गुंतवणूक करु नका अन्यथा नवीन अडचणी निर्माण होतील प्रवासात अडचणी निर्माण होण्याची शक्मयता. आजूबाजूचे शेजारी अथवा नातेवाईक यांच्याशी जपून वागा.
मिथुन
सर्व गरजा भागतील. आर्थिकबाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत. पण कौटुंबिक कारणासाठी मोठे खर्च मात्र निर्माण होतील. मनासारख्या अनेक गोष्टी सहज साध्य होतील त्यामुळे मानसिक सामर्थ्य वाढेल चतुर्थातील मंगळाचे भ्रमण काही बाबतीत वादावादी निर्माण करील. या आठवडय़ात आपण कुणाचीही जबाबदारी स्वीकारू नका अंगलट येऊ शकते
कर्क
मार्गी होणारा शनि नोकरी व्यवसाय व आर्थिक बाबतीत चांगला नाही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा डोळय़ांची काळजी घ्या संतापाच्या भरात कुणालाही काहीही बोलू नका कुणीतरी त्याचा गैरवापर करू शकतील गरजेच्या वेळी पैसा मिळत राहील आरोग्य आणि वैवाहिक जीवनात समाधान राहील एखादे निमित्त होऊन काही आजार निर्माण होतील मशिनरीशी संबंध असेल तर चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या.
सिंह
शनी मार्गी होत आहे कारखानदारी व लोखंडाशी संबंध असेल तर काळजी घ्या वैवाहिक जीवनात कटूता येऊ देऊ नका. किरकोळ प्रसंग नको त्या थरापर्यंत जाऊ शकतात. काही नातेवाईकांच्या बाबतीत जपूनच निर्णय घ्यावे लागतील. कोर्ट मॅटर अथवा सरकारी कामाच्या बाबतीत अडथळे येण्याची शक्मयता आहे. सूर्याची आराधना चालू ठेवा. बऱयाच अडचणीतून मार्ग निघेल. कुणी कितीही आग्रह केला तरी वाहन शक्मयतो कोणालाही देऊ नका.
कन्या
मार्गी होणाऱया शनीमुळे अडलेल्या कामांना गती मिळेल. नोकरीत सुट्टीवर अथवा बदलीवर गेलेल्या काही जणांच्या चुका तुम्हाला निस्तराव्या लागतील. संततीच्या बाबतीत अडथळे निर्माण होतील. काही जणांच्या विचित्र कृत्यामुळे नको त्या प्रकरणात अडकले जाल. त्यामुळे प्रसंगावधान ठेवा. काही निर्णय स्वतःच्या मनाने घेणे योग्य ठरेल. मार्गी गुरुची कृपा असल्याने व्यावसायिक बाबतीत अनुकूल घडामोडी.
तूळ
मार्गी होणाऱया गुरु व शनीमुळे महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्मयता आहे. त्यातील काही लाभदायक तर काही नुकसानकारक ठरू शकतील. त्यासाठी कोणतेही काम विचारपूर्वक मन शांत ठेवून आणि चारचौघांच्या सल्ल्याने करा. लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ योग्य ठेवा म्हणजे पुढील काही योजनासाठी त्याचा योग्य वापर करता येईल.
वृश्चिक
मार्गी होणाऱया शनि गुरुमुळे महत्त्वाची मोठी कामे होतील पण काही बाबतीत अडचणी निर्माण होतील. आर्थिकबाबतीत मोठे यशही मिळेल. कर्तव्य नि÷ा धाडस यांच्या जोरावर मोठे यश मिळवू शकाल. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर मनासारखे चांगले श्रीमंत खानदानी आणि सुसंस्कृत घराणे येऊ शकेल पण काही बाबतीत संयम ठेवणे आवश्यक.
धनु
मार्गी होणारे शनि व गुरु दोघेही लाभदायक स्थितीत आहेत. कोणत्याही क्षेत्रात असला तरी मोठा फायदा होईल. साडेसातीचा प्रभाव कमी होत जाईल. पण त्याचबरोबर काही नव्या समस्या निर्माण होऊ शकतात. मन शांत ठेवून निर्णय घ्यावा लागेल. अनावश्यक खर्चाला फाटा द्या. संबंध नसेल अशांच्या अंतर्गत व्यवहारात लक्ष घालू नका. जुने वाहन अथवा वस्तू विक्री करताना काही भाग तुटण्याची अथवा मोडतोड होण्याची शक्मयता.
मकर
राशीस्वामी शनी मार्गी होत आहे अडलेली अनेक मार्गस्थ होऊ लागतील पण आपण करतो ते सर्व योग्य असते असे नसते त्यामुळे काही बाबतीत अनेकांचा सल्ला घेऊनच निर्णय घेणे आवश्यक ठरते आरोग्याची विशेष काळजी घ्या राहूचे भ्रमण कोणतेही काम सुरळीत पार पडू देणार नाही त्यामुळे मन शांत ठेवूनच कमी करावी लागतील
कुंभ
मार्गी होणारा गुरु विवाहासह सर्व मोठय़ा कामात यश मिळवून देईल पण शनि साडेसातीचा प्रभाव वाढविल त्यामुळे मानसिक त्रास, खर्चात वाढ, खोटे आरोप येणे असे प्रकार घडण्याची शक्मयता आहे. त्यासाठी सावधगिरीने वागा कुणालाही निष्कारण तुमच्या प्रकरणात हस्तक्षेप करू देऊ नका आर्थिकबाबतीत ग्रहमान उत्तम आहे जागा आणि वाहन याबाबत अपेक्षा पूर्ण होतील. मशिनरी बिघडली असेल तर ती सुरू होईल.
मीन
मार्गी होणारा शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरू करील. काही कामे मिळू शकतात. त्यामुळे काळ आणि वेळ यांचे योग्य नियोजन करूनच पुढे जात राहा. आपण ठरवलेले प्रत्येक काम होतेच असे नाही व नको असले तरी काही गोष्टी कराव्या लागतात याचा अनुभव येईल. कुटुंबीयांच्या कृत्याकडे लक्ष द्या. त्यांनी केलेल्या काही चुका महागात पडू शकतील आर्थिक बाबतीत मात्र हा सप्ताह अतिशय चांगला. पूर्वी जर कोठे गुंतवणूक केलेली असेल तर ती परत मिळू शकते. भाडेकरू मालक वाद विवाद आणि कोर्ट प्रकरणे असतील तर मार्ग निघेल.