ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजस्थानचे भाजपाचे आमदार प्रताप भील यांच्याविरोधात १० महिन्यात दुसऱ्यांदा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भिल यांच्याविरोधात बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. भील हे राजस्थानच्या गोगुंडा मतदारसंघातून आमदार आहेत. या दोन्ही घटनांमध्ये आमदार भील यांनी महिलांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊन, लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
आमदार प्रताप भील यांच्याविरोधात दुसऱ्यांदा घडलेल्या घटनेत एका महिलेने अंबामाता पोलीस अधीक्षकांकडे जाऊन नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. भीलने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलंय.