फायजर कंपनीच्या लसीचा 5 जणांमध्ये गंभीर दुष्परिणाम दिसून आला आहे. फिनलंडच्या वैद्यकीय यंत्रणेला यासंबंधी तक्रार प्राप्त झाली आहे. 27 डिसेंबरपासून युरोपीय देशांमध्ये सामूहिक लसीकरण सुरू झाले होते. 5 जणांनी दुष्परिणामांची तक्रार केली आहे. त्यांचा तपशील गोपनीय असल्याने तो उघड करता येत नाही. परंतु लवकरच यासंबंधी माहिती संकेतस्थळावर मांडणार आहोत. रिऍक्शनची प्रकरणे वाढू शकतात, असे फिनलंडच्या चीफ फिजिशियन मैया कौकोनें यांनी म्हटले आहे.
Previous Articleबोलक्या बाहुल्यातून शिक्षण आनंददायी करणारे ‘कला शिक्षक’
Next Article दिल्लीत मागील 24 तासात 424 नवे कोरोना रुग्ण
Related Posts
Add A Comment