बेळगाव : कणकुंबी गावात लोककल्प फौंडेशन व डॉ. प्रभाकर कोरे केएलई दंत महाविद्यालयतर्फे दि. 29 रोजी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शाळकरी मुले व कणकुंबी गावातील नागरिकांनी लाभ घेतला. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फौंडेशनच्या स्वयंसेवकांनी शिबिराचे नियोजन केले होते. लोकमान्य सोसायटीतर्फे सर्व उपस्थित डॉक्टरांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. या शिबिरात दंत तपासणीसह योग्य मार्गदर्शनही करण्यात आले.
Previous Articleआरपीडी कॉर्नर येथे पिझ्झा हटचे उद्घाटन
Next Article लोकमान्य सोसायटीतर्फे बालदिना निमित्त नेत्र तपासणी
Related Posts
Add A Comment