प्रतिनिधी /मडगाव

वेरोडा-कुंकळळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात आज सोमवार दि. 9 रोजी पहिल्या श्रावणी सोमवार उत्सवानिमित्त सायंकाळी 7 वा. ‘अंतर्नाद क्रिएशन’ निर्मित गौरीश फडते देसाई पुरस्कृत ‘शब्दसुरांचे देणे’ हा मराठी भाव, भक्ती व नाटय़गीतांचा कार्यक्रम कोविड-19चे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आला आहे.
समाजात सात्विक व आध्यात्मिक भाव जागृत होईल व ही महामारी कायमची दूर होईल अशी भावना संस्थानाचे अध्यक्ष गौरीश फडते देसाई तसेच देवस्थान समितीची आहे. तसे गाऱहाणे घालून या उत्सवाला सुरवात केली जाईल. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका नेहा काळे नेने (मुंबई), नरसिंह साने (सावई-वेंरे, गोवा) यांचा सहभाग असून त्यांना विष्णू शिरोडकर (सिंथेसाइझर), यतीन तळावलीकर (तबला), पवन वळवईकर (पखवाज), प्रकाश आमोणकर (ऑक्टोपॅड), प्रदीप पंडित (निवेदन), रूद्रेश फोंडेकर (ध्वनीसंकल्पना) यांचा सहभाग असणार आहे असे देवस्थान समितीचे अध्यक्ष गौरीश फडते देसाई यांनी कळविले आहे.