अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही ट्रोलिंगचा अनुभव घेतला आहे. तेजस्विनीचा साडी डिझाइनचा व्यवसाय आहे. याशिवाय तेजस्विनीने पडदय़ावर पारंपरिक स्त्राr ते आधुनिक युवतीपर्यंतच्या भूमिका केल्या आहेत. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. त्यामध्ये साडी तसेच पारंपरिक ड्रेसमधील फोटोही असतात. पण जेंव्हा तिने मॉडर्न ड्रेसमधले फोटो शेअर केले तसेच बोल्ड लूकमधले फोटो शेअर केले तेव्हा तिच्यावर ट्रोलिंगचा पाऊस पडला होता. समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची भूमिका केलेल्या कलाकार असून तुम्ही असे फोटो कसे पोस्ट करता, अशा कमेंट तिला आल्या होत्या. त्यावर तेजस्विनीने सुनावले होते की, मी अभिनेत्री आहे. भूमिकेनुसार मला पडदय़ावर दिसावे लागते. व्यक्तिगत आयुष्यात मी स्वतंत्र आहे. मी ठरवेन, मी काय परिधान करायचे ते, यावरून कमेंट करू नये.
Previous Articleजगातील सर्वात भीतीदायक जंगल
Next Article ‘बंटी और बबली 2’चा टीझर सादर
Related Posts
Add A Comment