बेंगळूर : राज्यात कोरोनाच्या नव्या बाधितांच्या नोंदीचा आलेख खाली येत आहे. राज्यात मागील चोवीस तासांत 1,53,741 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 1.48 टक्के इतका आहे. राज्यात शुक्रवारी 2,290 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 3,045 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 68 रुग्णांचा बळी गेला आहे. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 28,67,158 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 27,93,489 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 35,731 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Previous Articleरविवारपासून तीन दिवस राज्यभरात मुसळधार
Next Article नूतन राज्यपाल गेहलोत यांचे उद्या पदग्रहण
Related Posts
Add A Comment