ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या कारवाईदरम्यान जम्मू-काश्मीरचे पोलीस एएसआय बाबू राम शहीद झाले.
श्रीनगर येथील पंथा चौकात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि श्रीनगर पोलिसांच्या संयुक्त चेक नाक्यावर गोळीबार केला. त्यानंतर सर्च मोहीम राबविण्यात आली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराव घातला. त्यावेळी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला जवान आणि पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर एक पोलीस शहीद झाला.
या भागात सुरक्षा दलाकडून अजूनही सर्च मोहीम सुरू आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील झादुरा भागात झालेल्या चकमकीतही तीन जवानांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.