ऑनलाईन टीम : लखनऊ
समाजवादी पक्षाचे आमदार संजय लाथर यांची उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली, याबाबतची माहीती असे प्रधान सचिव राजेश सिंह यांनी मंगळवारी सांगितली.
समाजवादी पक्षाचे आमदार अहमद हसन यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. सोमवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, संजय लाथर यांना 28 मार्चपासून विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्यात आली आहे, असे सिंह म्हणाले.
लाथर यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून कार्यकाळ 26 मे 2022 रोजी संपणार आहे. 100 जागांच्या विधान परिषदेत सत्ताधारी भाजपचे 34, समाजवादी पक्षाचे 17, बसपा चार, काँग्रेस आणि अपना दल (सोनेलाल) प्रत्येकी एक, शिक्षक दल (अराजकीय दोन, स्वतंत्र गट एक, स्वतंत्र एक आणि निर्बल भारतीय शोषित हमारा आम दल (निषाद) एक सदस्य असे संख्याबळ आहे.
स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील 36 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 12 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. यापैकी काही जागांसाठी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.