प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील काही समुद्र किनाऱयांवर जेलीफिश आढळे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुमारे 90 लोकांना जेलीफिशने डंक मारला आहे. या पैकी कळंगुट, बागा समुद्र किनाऱयावर 55 लोकांना डंग मारला आहे, कांदोळी समुद्र किनाऱयांवर 10 तर उत्तर गोव्याती समुद्र किनाऱयांवर 25 लोकांना जेलीफिशचा त्रास सोसावा लागला आहे. ज्यांना जेलीफिशने डंग मारलेल्यांना जवळपासच्या इस्पितळात भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
कोविड 19 काळ दरम्यान गोव्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असल्याने समुद्र किनाऱयावर शुकशुकाट पसराला होता. नंतर पुन्हा पर्यटन व्यवसाय सुरु झाल्याने देशी पर्यंटकांची समुद्र किनाऱयावर येजा सुरु झाली होती. त्यामुळे काही पर्यटकांनाही जेलीफिशचा मारा भोगावा लागला.
पावसाळा हंगाम संपला की हिवाळी हंगाम सुरु होतो. याच हंगामात जेलीफिश समुद्र किनाऱयावर आढळून येतात. जेलीफिश हे दोन प्रकारचे असतात विषारी जेलीफिश व विश नसलेले जेलीफिशी सहसा जेलीफिश कुणाला मुद्दामहून डंग मारण्यासाठी जात नसतात त्यांच्यावर पाय पडला किंवा त्यांना पाय लागल्यास ते डंग मारतात. विषारी जेली फिशने डंग मारल्यास त्याचा त्रास मोठया प्रमाणात होतो.
फोटो-