प्रतिनिधी/सांगली
बुधवारी जिल्ह्यात विक्रमी 21 नवीन रुग्ण वाढले त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 405 झाली आहे. बुधवारी एक ही रुग्ण कोरोना मुक्त झाला नाही , त्यामुळे उपचारातील रुग्ण संख्या 152 वर पोहोचली आहे. या उपचारातील रुग्णांमध्ये पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिरज शहरात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. शहरातील मध्यवर्ती वस्तीत नवीन तीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये रमा उद्यान परिसरातील 68 वर्षीय व्यक्ती, दुर्ग कमान येथील साठ वर्षे महिला आणि मुजावर गल्लीतील वीस वर्षीय युवक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तासगाव शहरातही तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये 22 वर्षाची महिला, 34 वर्षाची व्यक्ती आणि 60 वर्षाची व्यक्ती यांचा समावेश आहे . बावची आणि गोमेवाडी येथे प्रत्येकी दोन रुग्ण वाढले आहेत. आसंगी, बिळूर ,उपवळे ,शिराळे खुर्द, आमनापूर, बोरगाव ,दुधोंडी ,मेंढेगिरी येथे प्रत्येकी एक रुग्ण वाढला आहे . तर कर्नाटकातील अथणी आणि विजापूर येथील दोन बाधित व्यक्तींच्या वर मिरजेत उपचार सुरू करण्यात आले आहेत
Trending
- Kolhapur Breaking: कागल तालुक्यातील बामणी जवळ अनोखी इसमाचा खून?
- कन्नड सक्तीविरोधातील हुतात्म्यांना आज अभिवादन
- ‘राकसकोप’मध्ये केवळ तीन फूट पाणी
- शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागताचा जल्लोष
- यंदा वळिवाचा पाऊस निम्म्यापेक्षा कमी
- शनिमंदिर परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच
- उत्तर कर्नाटकसाठी 5 टीएमसी पाणी सोडण्याची महाराष्ट्राकडे मागणी
- कामगारांचा कामगार कार्यालयाला घेराव