सातारा/प्रतिनिधी
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 50, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 77, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 2, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 7, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 14 असे एकूण 150 जणांचे अहवाल निगेटिवह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
77 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
दि.13 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 69 असे एकूण 77 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
Previous Articleसदाशिवनगर येथील गर्भवती महिलेला कोरोना
Next Article पोलिसांना फक्त चारच विक्रेते सापडले कसे ?
Related Posts
Add A Comment