बरे झाल्याने तब्बल 74 जणांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहरात आज, बुधवारी रात्री 9.35 वाजेपर्यंत 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 5 जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने तब्बल 74 जणांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली.
सोलापुर शहरात आज 180 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 137 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 43 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 29 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2326 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 5 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने तब्बल 74 जणांना घरी सोडण्यात आले.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 12249
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2326
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 255
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 735
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1336
-प्राप्त तपासणी अहवाल : 12249
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 9923
Previous Articleसांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा 400 पार, 21 नवे रुग्ण
Related Posts
Add A Comment