प्रतिनिधी / अक्कलकोट
सांगवी बु।। ता.अक्कलकोट येथी बोरी नदीचे पात्रात अज्ञात आरोपीनी मयतास जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने सुतळीचे पोत्यात पाय व मान एकत्र करून बांधुन पाण्यात ठाकुन खून केलेल्या गुन्हयाचा तपास करणे अतीशय क्लीष्ट असताना आरोपीना अक्कलकोट उत्तर पोलीसांकडुन २४ तासाचे आत या घटनेतील आरोपी जेरबंद केले आहेत. दिनांक ०९/१०/२०२० रोजी पोलीस ठाणे अक्कलकोट येथे मौजे सांगवी बु।। ता.अक्कलकोट येथील लोकांनी पोलीस ठाणेस माहिती देवुन कळवीले की, सांगवी बु।। गावचे शिवारातील बोरी नदीच्या पात्रामध्ये पुलाखाली पाण्यामध्ये एक अनोळखी इसमास जीवे ठार मारून पोत्यामध्ये भरून टाकले आहे. या माहितीवरून पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन तपास सुरू केला .तक्रार दाखल केली.
तक्रारीचे स्वरूप पाहता मयत यास कोणी ठार मारले असावे व त्यामागचे मुख्य कारण काय या बाबत काहीही माहिती प्राप्त होत नसल्याने सदर गुन्हयाचे उखल करणे कामी पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनतर इतर सहआरोपी यांना कर्नाटक राज्यातील हिरोळी गावातुन मोठया शिताफीने व कारवाई करत असल्याची कोणतीही माहिती गावातील लोकांना समजुन येणार नाही अशा परिस्थीत इतर सर्व आरोपी यांना रातोरात्र ताब्यात घेतले.
सदरची कामगीरी सकाळी गावातील लोक जागे होण्याचे पुर्वी पुर्ण करून पोलीस पथक गावातुन अक्कलकोट येथे रवाना झाले.त्यानंतर ताब्यात घेतलेले आरोपी पोलीसी खाक्या दाखवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्यची कबुली दिल्याने आरोपी १) सैपन उर्फ गुटल्या इमाम बोबडे वय २२ वर्ष २) अनिल शिवपूत्र लिंगशेट्टी वय २२ वर्षे ३) वाघेश इरण्णा हणमशेट्टी वय ३० वर्ष सर्व रा.हिरोळी ता. आळंद जिल्हा कलबुर्गी ४) संजयकुमार हिरू राठोड वय २७ वर्ष रा.गांधी नगरतांडा,दुधनी ता.अक्कलकोट जिल्हा सोलापूर असे सदर गुन्हयामध्ये अटक केली आहे. सदर गुन्हा आरोपी यांनी नक्की कोणत्या कारणावरून केला आहे. याबाबत तपास चालु आहे.
Previous Articleवैराग शहरासह परिसरात विजेच्या गडगडांसह मुसळधार पाऊस
Next Article रब्बी हंगामासाठी नेर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
Related Posts
Add A Comment