ऑनलाईन टीम/ तरुण भारत
राज्यात पुन्हा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. शिवाय, ओमिक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. सध्या काही प्रमाणात निर्बंध देखील लादण्यात आलेले आहेत, मात्र दररोज आढळणारी रूग्ण संख्या ही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात १५ फेब्रुवारी पर्यंत महाविद्यालये बंद राहतील असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षत घेऊन विद्यार्थाना कोरोनाचा धोका पोहचू नये यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत कृषी वगळता सर्व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी विद्यापीठांनीही हा निर्णय लागू असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची असल्याचे सांगत मंत्री सामंत यांनी हा निर्णय घेतला आहे.
परीक्षा ऑनलाईनच होणार
मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. “सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं”, असं ते म्हणाले.

