Eknath Shinde : शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचवण्यासाठी आम्ही कटीबंध आहोत. 75 हजार शासकीय नोकऱ्या देण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.’शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. आज ते रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अडिच वर्षातला कारभार जनतेनं पाहिला आहे.जनतेची कामं झालीच पाहिजे कारणं चालणार नाही.आम्ही घरी बसणारे नाही असा टोला लगावला. तसेच या कार्यक्रमात शिंदे यांनी उदय सावंत यांच कौतुक केलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत. ही बाळासाहेब आणि दिघे साहेबांची शिकवण आहे.सरकरी काम सहा महिने थांब हा समज नष्ट करणार.मी आजचा कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय.शासनात आता पूर्वीसारखे स्प्रीडब्रेकर नाहीत.मी फेसबूकवर बोलत नाही असा टोलाही ठाकरेंना लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले, तळागाळापर्यंत योजन पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना दिल्या आहेत. ते आता 75 हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहेत.मी उमेदवारांना थेट बोलावून नियुक्तीपत्रे देतो.20,552 लाभार्थी आज काम पूर्ण झालेलं पाहतील. शासन आपल्या दारी 30 मे रोजी सिंधुदुर्गात होणार असल्य़ाचेही यावेळी ते म्हणाले.
Previous Articleशिरोळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह अन्य पाच जागा रिक्त; त्वरित भरण्याची नागरीकांची मागणी
Next Article गोकुळच्या अध्यक्षपदी अरूण डोंगळे यांची बिनविरोध निवड
Related Posts
Add A Comment