घरात केला आहे परफ्यूमचा साठा, झोपतेवेळीही बाळगते सोबत
जगात कित्येक लोकांना वेगवेगळय़ा गोष्टी आवडत असतात. परंतु काही लोकांची पसंत त्यांच्यासाठी ध्यास ठरत असतो. एका अशाच महिलेला सुगंधाचा छंद असून तिने स्वतःच्या घरात परफ्यूमच्या हजारो बॉटल्स जमा करून ठेवल्या आहेत.
जोसफिन नावाच्या महिलेला परफ्यूम आणि अत्तराबद्दल इतके अधिक प्रेम आहे की तिने स्वतःच्या घराला त्यानेच भरून टाकले आहे. जोसफिन रात्री झोपतेवेळीही या परफ्यूमच्या गराडय़ातच राहणे पसंत करते. एक परफ्यूम फार दिवस वापरू शकत नसल्याने परफ्यूमच्या हजारो बॉटल्स जमा करून ठेवल्याचे तिने टिकटॉकवरील स्वतःच्या चाहत्यांना सांगितले आहे.

जोसफिनकडे परफ्यूमचे एक मोठे कलेक्शन आहे. तिने घरात परफ्यूमच्या हजारो बॉटल्स जमा करून ठेवल्या असून यात अनेक प्रकारच्या फुलांचा सुगंध आहे. तसेच तिने स्वतःला सर्वाधिक पसंत असलेल्या 5 परफ्यूमची नावे शेअर केली आहेत. जितका अधिक चांगला परफ्यूम वापराल, तितकेच तुम्हाला रिलॅक्स आणि चांगले वाटते असे तिचे म्हणणे आहे. तिला सर्वाधिक आवडणाऱया परफ्यूमची किंमत सुमारे 5000 रुपये इतकी आहे.
चांगल्या परफ्यूमचा छंद तसा सर्वांनाच असतो, परंतु त्याची अधिक किंमत असल्याने ती खरेदी करणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशा स्थितीत जोसफिनकडील हजारोंची किंमत असलेले परफ्यूम पाहून लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.