पुणे \ ऑनलाईन टीम
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरावर सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा मारला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडून एजन्सीचा गैरवापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यामध्ये आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकारण हे विचारांचं असतं आणि लोकांच्या सेवेसाठी असतं. आजपर्यंत या देशात एजन्सीचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला नाही किंवा ऐकलेला देखील नाही.एजन्सीचा गैरवापर ही त्यांची स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून पवार साहेबांना पण नोटीस आली होती. हा अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात अस राजकारण कधी होत नाही. तसेच महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकांना त्रास देण्याकरता केला नाही. ही नवीन एसओपी ज्याला म्हणता ती स्टाईल काढलेली आहे. हे जाणून बुजून केलं जातं असल्याचे दिसून येते.
महाविकास आघाडी विकासाचे राजकारण करत आहे. आम्ही कोरोना तिसऱ्या लाटेसाठी काम करत आहोत. आम्ही कधी वैयक्तिक राजकारण करत नाही व करणाऱ नाही, असे देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
Related Posts
Add A Comment