बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजन

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अविनाश पोतदार यांचा धारवाड विभागाचे समन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल व बेळगावचा सुपूत्र रोनित मोरे याचा रणजी क्रिकेटमध्ये आपले 100 विकेट पूर्ण केल्याबद्दल बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
मंडोळी रोड येथील गॅलक्सी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष रोटरी क्लबचे माजी गव्हर्नर अविनाश पोतदार यांची केएससीए धारवाड झोन विभागाच्या समन्वयक म्हणून 2019 ते 2022 या कालावधीसाठी करण्यात आली होती. त्यांनी बेळगाव शहरात ऑटोनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. त्याचप्रमाणे धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेत अनेक मोलाचे उपक्रम राबविले आहेत. त्यासाठी बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे त्यांचा खास सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
बेळगावचा सुपुत्र रोनित मोरे बेळगावात शालेय जीवनापासून क्रिकेटचे धडे गिरवून धारवाड विभागीय त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य क्रिकेट संघात आपले स्थान बळकट करून गेली सहा-सात वर्षे कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. नुकतेच त्याने रणजी सामन्यातून 100 गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. मागील रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळी (37) घेण्याचा त्याने पराक्रम गाजवला. हे औचित्य साधून बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने रोनितचा सत्कार करण्यात येणार आहे.
बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे गॅलक्सी हॉल मंडोळी रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी क्लबच्या सभासदानी व क्रिकेटपटूंनी उपस्थित रहावे असे कळविण्यात आले आहे.