competitive Examination Result : राज्यसेवा आयोगाच्या वतीने 2021 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर झाला या परीक्षेत कोल्हापूरचे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यंदाही स्पर्धा परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी झेंडा लावला आहे.
राज्यसेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाला विश्वजित गाताडे (म्हाळुंगे – करवीर) यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. तर राज्यसेवा 2020 मध्ये सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदी निवड झाली होती. या पदावर सध्या ते कार्यरत आहेत. ऐश्वर्या नाईक – डुबल (हळदी,करवीर सध्या रा. कराड) यांची नगरपालिका मुख्याधिकारी निवड झाली आहे. यापूर्वी 2020 च्या परीक्षेत एक्साईज सब इन्स्पेक्टरपदी निवड झाली होती. या पदावर ते कार्यरत आहेत. अपर्णा यादव ( निगवे दुमाला – करवीर) यांची जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गट अ पदी निवड झाली आहे. यापूर्वी राज्यसेवा 2020 मधून नायब तहसिलदार पदी निवड झाली होती. सध्या त्या ठाणे कल्याण येथे कार्यरत आहेत.
स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न हवे
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावी त्या दृष्टीने अभ्यास करावा. अपयशाचा सामना करीत अभ्यासात सातत्य ठेवत प्रयत्न केले पाहिजेत. लहानपणापासून पाहिलेले स्वप्नपूर्ती करण्यासाठी क्रमिक पुस्तकांचा अभ्यास आणि सराव पेपर सोडवणे गरजेचे आहे.
अपर्णा यादव
प्रामाणिकपणे कष्ट करण्याची गरज स्पर्धा परीक्षेचा अभ्यास टाईमपास म्हणून न करता प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश निश्चित मिळते .मी सातत्याने केलेल्या अभ्यासाचे फळ मला मिळाले आहे .एवढ्यावरच समाधान न मानता मी यूपीएससीचा अभ्यास करून ,त्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करेन.
ऐश्वर्या नाईक
नियोजनपूर्वक अभ्यास केला पाहिजे
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे. क्रमिक पुस्तकांसह पेपर वाचणे जागतिक घडामोडीचे माहिती घेणे यावरही भर द्यावा. स्वप्नांचा पाठलाग करून प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते .आपल्या यशात आपल्या पालकांचा मोठा वाटा असतो हे विद्यार्थ्यांनी विसरू नये.
विश्वजित गाताडे
Related Posts
Add A Comment