Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray )यांच्याजवळ एक अस्त्र आहे. जे ब्रम्हास्त्रापेक्षा जास्त प्रभावी आहे. ते म्हणजे टोमणा अस्त्र.टोमणे मारल्याशिवाय त्यांच कोणतच वाक्य पूर्ण होऊ शकत नाही.उध्दव ठाकरे यांना उद्योगाचे महत्व कळायला लागल याचा मला आनंद आहे. कारण महाराष्ट्रातील उद्योग घालवणारेच ते आहेत. देशातला सगळ्यात मोठा रोजगाराचा ‘रिफायनरी प्रोडेक्ट त्यांनी घालवला. अशा प्रकारचा विजय मिळवल्यानंतर आपल्या विरोधी विचारांचे लोकांचे तोंडभरून कौतुक करायचे असते. पण अजून त्य़ा मानसिकतेपर्यंत पोहचलेले ते दिसत नाहीत. महाराष्ट्रात जे काही घडलं त्याचा परिणाम त्यांच्या मनावर झालेला आहे असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उध्दव ठाकरे य़ांना लगावला. गुजरातमध्ये भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षित यश भाजपला मिळाले नाही. दर पाच वर्षांनी हिमाचलमधील सरकार बदलत अशी प्रथा आहे.यावर्षी आम्हाला अपेक्षा होती हा ट्रेंड आम्ही रोखू .हिमाचलमध्ये 42 टक्के मते भाजपला आणि आमच्यापेक्षा जास्त 1 टक्का मत कॉंग्रेसला मिळाले आहे. या 1 टक्क्यामुळे त्यांना मॅज्योरिटी मिळाले आहे. भाजप अजून त्याठिकाणी मेहनत करेल असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, मुंबई पालिकेवर भाजप आणि युतीचीच सत्ता येणार.
हेही वाचा- गुजरातचा विकास भाजपच करु शकतो सिध्द झाले- देवेंद्र फडणवीस
Previous Articleगुजरातच्या निकालावर देशाचा मूड दिसून येत नाही : शरद पवार
Related Posts
Add A Comment